महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुप्तधनासाठी नवविवाहितेचा बळी देण्याचा प्रयत्न फसला; अंबड तालुक्यातील प्रकार - नरबळी

गुप्तधनासाठी सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा बळी देण्याचा प्रयत्न अंबड तालुक्यातील दयाळ या गावात झाला. नरबळी हा अचुक मुहूर्तावर आणि शुद्धीत असलेल्या माणसाचा द्यायचा असतो, असा समज असल्याने विवाहितेचा बळी टळला.

गुप्तधनासाठी नवविवाहितेचा बळी देण्याचा प्रयत्न फसला; अंबड तालुक्यातील प्रकार

By

Published : Aug 24, 2019, 8:44 PM IST

Updated : Aug 24, 2019, 11:29 PM IST

जालना -गुप्तधनासाठी सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा बळी देण्याचा प्रयत्न अंबड तालुक्यातील दयाळ या गावात झाला. 15 ऑगस्ट रोजी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा प्रकार घडला.

गुप्तधनासाठी नवविवाहितेचा बळी देण्याचा प्रयत्न फसला; अंबड तालुक्यातील प्रकार
शेतामधील घरासमोर रात्रीच्या सुमारास नवविवाहितेला निर्वस्त्र करून स्नान घालण्यात आले. तिच्या केसांच्या बटाही कापण्यात आल्या. स्वतःची सुटका करून घेण्याच्या धडपडीमध्ये ही विवाहिता बेशुद्ध पडली. नरबळी हा अचुक मुहूर्तावर आणि शुद्धीत असलेल्या माणसाचा द्यायचा असतो, असा समज असल्याने विवाहितेचा बळी टळला. दोन दिवसानंतर या विवाहितेने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.या सर्व प्रकरणावरून माया मगरे या पीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे.दरम्यान, या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी माया मगरे यांची मामाच्या घरी जाऊन भेट घेतली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह शंकर बोर्डे हे यावेळी उपस्थिती होते.
Last Updated : Aug 24, 2019, 11:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details