जालना - अवैध वाळू माफियाकडून बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळ राजूर-फुलंब्री महामार्गावर पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. (Attack On Badnapur Police In jalana) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष दानवे या वाळू माफियावर बदनापूर तहसीलदार यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाळूचा हायवा ट्रक ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी ट्रक अडवला. दरम्यान, पाच जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला केल्याने सहायक पोलीस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला. दरम्यान, झालेल्या झटापटीत रामोडे गंभीर जखमी झाले आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला
पोलिसांनी डोंगरगाव शिवारात हायवा ट्रक अडवला असता, ट्रक चालकाने, पोलिसांनी आपला ट्रक अडवल्याची माहिती वाळू माफियांना दिली. मारुती स्विफ्ट कार मधून आलेल्या दोन महिला आणि चार ते पाच जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवल्याने आणि वाळूमाफियाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांना वाचवण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला.