महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यातून महाराष्ट्र एटीएसने आवळल्या शेख उमर शेख हबीबच्या मुसक्या, जालना येथून बावीसावी अटक

बेकायदेशीर कारवाया केल्याबद्दल पीएफआय सदस्यांविरुद्ध नोंदवलेल्या 4 एफआयआरच्या संदर्भात ATS महाराष्ट्राने शेख उमर शेख हबीब नावाच्या एका आरोपीला जालना, येथून अटक केली.

By

Published : Oct 11, 2022, 7:44 PM IST

Updated : Oct 11, 2022, 9:03 PM IST

जालना येथून बावीसावी अटक
जालना येथून बावीसावी अटक

जालना - बेकायदेशीर कारवाया केल्याबद्दल पीएफआय सदस्यांविरुद्ध नोंदवलेल्या 4 एफआयआरच्या संदर्भात ATS महाराष्ट्राने शेख उमर शेख हबीब नावाच्या एका आरोपीला जालना, येथून अटक केली. त्याची 15 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही माहिती दिली.

जालन्यात कारवाई -महाराष्ट्र एटीएसने जालना जिल्ह्यातून PFI संबंधित प्रकरणात केलेली ही 22वी अटक आहे. आरोपी शेख उमर शेख हबीब याला औरंगाबादच्या विशेष एनआयए न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली. राज्यात पीएफआय प्रकरणी सुरक्षा संस्थांनी छापे टाकून मोठी कारवाई नुकतीच केली होती.

देशभरात झाली होती छापेमारी - एनआयए व इतर तपास यंत्रणांनी संयुक्तपणे 22 सप्टेंबरला देशभरात केलेल्या कारवाईत PFI शी संबंधित 106 लोकांना अटक केली होती. त्यानंतर या लोकांच्या चौकशीतून काही गोष्टींचा आणि त्यासंबंधित व्यक्तींची नावे समोर आली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरात छापे टाकले होते.

PFI वर पाच वर्षाची बंदी - दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे (Ban On PFI) . केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे (PFI Banned Five Years). तपास यंत्रणांच्या शिफारसीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. यात अनेक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती.

Last Updated : Oct 11, 2022, 9:03 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details