महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Arjun Khotkar On Manoj Jarange Patil : समाजाचं भलं करायचं असेल, तर काही गोष्टी ऐकाव्या लागतात... अर्जुन खोतकर - आंदोलक मनोज जरांगे

Arjun Khotkar On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरुन राज्यभरात वातावरण तापलेलं असताना आंदोलक मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनधरणी करण्यात आली. ही चर्चा अखेर निष्फळ ठरली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Arjun Khotkar Jalna Lathicharge
अर्जुन खोतकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 11:20 AM IST

जालना : Arjun Khotkar On Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात वातावरण तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी व त्यांची समज काढण्यासाठी शिष्टमंडळ अंतरवाली सराठी इथं पाठवलं होतं. या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांना आंदोलन मागं घेण्याची विनंती केली. तसेच तीस दिवसाची मुदत सुद्धा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मनोज जरांगे यांना मागण्यात आली. मात्र मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कुठल्याही प्रकारची मुदत न देता फक्त चार दिवसाचा अवधी सरकारला देण्याचं मान्य केलं.

अर्जुन खोतकर यांची नाराजी : शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंसह आंदोलनकर्त्यांचं मत न जुळल्यामुळे अखेर आल्या पावली या शिष्टमंडळाला परत जावं लागलं. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिष्टमंडळातील सदस्य व माजी मंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे यांचे निकटवर्तीय अर्जुन खोतकर यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे. समाजाचं जर भलं करायचं असेल, तर थोडं ऐकावं सुद्धा लागते. तसेच मनोज जरांगे यांनी शासनाला वेळ वाढवून दिला पाहिजे. 30 दिवसाच्या नंतर एक दिवस सुद्धा शासन वेळ घेणार नाही. मात्र एवढी विनंती करुन सुद्धा आंदोलनकर्त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चर्चा अजून सुद्धा झालेली नाही, चर्चा करण्याकरिता दार अजून उघडंच आहे, असा सल्ला सुद्धा यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्याना दिला आहे.

कोण आहेतमनोज जरांगे? :जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी या छोट्याशा गावातील रहिवाशी आहेत. त्यांचं शालेय शिक्षण गावातच झालं. मातोरी इथं काही वर्षे घालवल्यानंतर जारंगे यांनी काहीकाळ जालना जिल्ह्यातील शहागड येथील एका हॉटेलमध्ये काम केलं. त्यांनी अंबड येथील साखर कारखान्यात नोकरी केली. त्यांची पत्नी आणि मुलं शहागड इथं राहतात. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात जरांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil Ultimatum: शिंदे-फडणवीस सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम देणारे कोण आहेत मनोज जारंगे? जाणून घ्या सविस्तर
  2. OBC leaders on Maratha quota : मराठा ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांची काय आहे भूमिका? जाणून घ्या सविस्तर
  3. Prakash Ambedkar on Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, घेतली मनोज जरांगेंची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details