जालना -वडिलोपार्जित जमिनीचा फेर घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला रंगेहाथ पकडले. अमोल मारुती कोंकटवर (वय, २५ ) असे तलाठ्याचे नाव आहे. याप्रकणी तलाठ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१० हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडले
वडिलोपार्जित जमिनीचा फेर घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला रंगेहाथ पकडले. अमोल मारुती कोंकटवर (वय, २५) असे तलाठ्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचे आजोबा आत्माराम भाऊराव सोनवणे, यांच्या नावे इंदलगाव शिवारात गट क्रमांक 45 मध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीसाठी कागदपत्रे गावच्या तलाठ्याकडे देण्यात आली होती. मात्र, ज्या तलाठ्याकडे कागदपत्रे दिली त्याची बदली झाली. त्यामुळे सदरील तक्रारदाराने त्या तलाठ्याची भेट घेऊन फेर घेण्यासाठी दिलेल्या कागदपत्राची विचारणा केली. त्यावेळी त्या तलाठ्याने सदरील कागदपत्रे ही बदलून आलेल्या तलाठ्याकडे दिली असल्याचे सांगितले.
त्यानुसार या प्रकरणातील तक्रारदाराने नवीन बदलून आलेले तलाठी अमोल मारुती पवार यांची भेट घेतली आणि फेर घेण्याविषयीच्या कामाविषयी चौकशी केली. मात्र, कोंकटवर यांनी फेर घेण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा काम होणार नाही असे सांगितले. परंतू, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे दिनांक २९ मे रोजी तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने तलाठ्याची अंबड येथे या प्रकरणाची शहानिशा केली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच 4 जूनला लाच देण्याचेही ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि या सापळ्यांमध्ये आरोपी तलाठी अमोल कोंकटवर हे १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेला.