महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर; महिलांचे आरक्षण 1 फेब्रुवारीला - Jalna Latest News

जालना तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात पार पडली. एकूण 123 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत पार पडली.

Announcing the reservation for the post of Sarpanch in the district
ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर; महिलांचे आरक्षण 1 फेब्रुवारीला

By

Published : Jan 28, 2021, 5:23 PM IST

जालना - नुकतीच ग्रामपंचय निवडणूक पार पडली. या निवडणूकीतील सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. या निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर आज तहसील कार्यालयात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर; महिलांचे आरक्षण 1 फेब्रुवारीला

जालना तालुका -

जालना तालुक्यातील एकूण 123 ग्रामपंचायतचे आरक्षण पुढील प्रमाणे, अनुसूचित जाती 19, अनुसूचित जाती महिला 9, अनुसूचित जाती दोन, अनुसूचित महिला एक, नागरीकांचा मागास प्रवर्ग 33, महिला 16, सर्वसाधारण आरक्षण 69, सर्वसाधारण महिला 34, याप्रमाणे एकूण 123 ग्रामपंचायत साठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

महिला आरक्षण 1 फेब्रुवारीला -

आज ही आरक्षणाची प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयात पार पडली. मात्र, या ग्रामपंचायतींपैकी महिलांना कोणती ग्रामपंचायत संबंधित प्रवर्गाच्या महिलेला आरक्षित होणार आहे. यासंदर्भातील आरक्षण एक फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये जाहीर होणार आहे .

तहसील कार्यालयात पार पडली सोडत-

ही आरक्षण सोडत प्रक्रिया अप्पर तहसीलदार अविनाश कोरडे यांच्या नियंत्रणाखाली जालना तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी नायब तहसीलदार शितल बंडगर, नायब तहसीलदार तुषार निकम, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, यांच्यासह जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संजय कुलकर्णी, मंडलाधिकारी भोरे, आदींची उपस्थिती होती. तहसील कार्यालयातील मैदानावर संबंधित गावांचे इच्छुक उमेदवार ही मोठ्या संख्येने आले होते. त्यानंतर नोटीस बोर्डवर लावलेली यादी पाहण्यासाठी गावकर्‍यांनी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details