महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती गरजूंना धान्य वाटप करुन साजरी

भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथे स्व‌.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती साजरी धान्य वाटप करुन साजरी करण्यात आली. अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

annasaheb-jawale-birth-anniversary-celebrate-by-food-grain-distribution
छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती गरजूंना धान्य वाटप करुन साजरी

By

Published : Apr 17, 2020, 8:03 AM IST

Updated : Apr 17, 2020, 3:19 PM IST

जालना- सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन करून संचारबंदी लागू केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभमीवर आखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी प्रल्हादपुर येथे लाॅकडाऊन मुळे बिकट परिस्थितीमध्ये असलेल्या ४५ गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले.

छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती गरजूंना धान्य वाटप करुन साजरी

आखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णु गाढे व संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावतीने गहु व तांदुळ जीवनावश्यक साहित्याचे वाटप लाॅकडाऊनचे नियम पाळत करण्यात आले. स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती धान्य वाटप करुन साजरी करण्यात आली. यावेळी छावा संघटनेचे ज्ञानेश्वर गायकवाड,सुखदेव सिरसाठ आदी उपस्थित होते.

Last Updated : Apr 17, 2020, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details