जालना : पणन हंगाम(रब्बी) 2020-21 अंतर्गत हमी भावाने मका खरेदीसाठी ऑनलाइन मॅसेज दिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी शुक्रवारी 31 रोजी भोकरदन तहसील कार्यल्यासमोरील भोकरदन-जालना रस्त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. दरम्यान, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजा देशमुख यांनी आंदोलन स्थळाकडे धाव घेऊन संतप्त शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मकाखरेदीसाठी संतप्त शेतकऱ्यांचे भोकरदन-जालना रस्त्यावर ठिय्या आंदोलन - farmers agitation in bhokardan tehsil news
राज्य सरकारने उद्धिष्ट पूर्ण झाले म्हणून 30 जुलै रोजीच मका खरेदी बंद केली. यावेळी उर्वरित शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांची भेट घेऊन मकाखरेदी बाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, यावेळी तहसीलदारांनी उडवा उडवीची भाषा वापरल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी सरळ तहसील कार्यालया समोरील भोकरदन-जालना या मुख्य रस्त्यावर ठिय्या दिला.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या माध्यमातून पणन हंगाम(रब्बी)2020-21 अंतर्गत राज्यात मका व ज्वारीची हमी भावाने खरेदी करण्यात येत आहेत. त्यानुसार भोकरदन तालुक्यातही मोरेश्वर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून हमी भावाने मका खरेदी करण्यात येत आहे. मका विक्री करण्यासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोरेश्वर खरेदीविक्री संघाकडे ऑनलाइन नोंदणी केली असून त्यानुसार बहुतेक शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला आहे.
मका खरेदीसाठीचे उद्धिष्ट पूर्ण झाल्याने यापूर्वीच मका खरेदी बंद करण्यात आली होती. पण राज्यात मक्याचे उत्पादन जास्त झाल्याने उद्धिष्ट पूर्ण होऊनही केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात 65 हजार मेट्रिक टन मका खरेदी केला. व दुसऱ्या टप्प्यात 25 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यासाठी वाढीव उद्धिष्ट देऊन 31 जुलैपर्यंत मका खरेदीसाठी विशेषबाब म्हणून परवानगी दिली. परंतु राज्य सरकारने उद्धिष्ट पूर्ण झाले म्हणून 30 जुलै रोजीच मका खरेदी बंद केली. तर, 25 जुलैपासून मका खरेदीसाठी घेऊन येण्याचे मॅसेज दिलेल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या मक्याची खरेदी बाकी असतानाच खरेदी बंद करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन मकाखरेदी बाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, यावेळी तहसीलदारांनी उडवा उडवीची भाषा वापरल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी सरळ तहसील कार्यालया समोरील भोकरदन-जालना या मुख्य रस्त्यावर ठिय्या दिला. यावेळी दिलेल्या निवेदनावर कैलास पाजगे, रामेश्वर लक्कस, किशोर महाले, रमेश तराल, नरेंद्र सपकाळ, काशिनाथ पवार, दीपक जाधव यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.