जालना- अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ती, मदतनीस व उत्कृष्ट अंगणवाडी केंद्र अशा विविध स्तरावर पुरस्कार देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 24 डिसें) रोजी जि.प.च्या सभागृहांमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
जालन्यात अंगणवाडी महिला कर्मचारी उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपाध्यक्ष सतीश टोपे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुमन घुगे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा शिंदे, जयमंगल जाधव, रघुनाथ तौर आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. लोंढे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.
जालना जिल्ह्यातून तीन पर्यवेक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय देण्यात येणाऱ्यांना अनुक्रमे 4 हजार, 3 हजार 500 आणि अडीच हजार रूपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.
तसेच 24 अंगणवाडी कार्यकर्त्यांनाही पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये 12 सेविकांना प्रथम 3 हजार रुपये, द्वितीय अडीच हजार रुपये, 12 मदतनिसांना प्रथम 2 हजार तर द्वितीय दीड हजार रुपये आणि बारा उत्कृष्ट अंगणवाडी केंद्रांचालविणाऱ्या सेविकेला प्रत्येकी 2 हजार रुपये अंगणवाडी चालविणाऱ्या सेविकेला देण्यात आले.
हा पुरस्कार प्रदान सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून अन्य कार्यकर्त्या देखील आल्या होत्या. हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन तांबे, साळवे, वाघमारे, यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा - जिल्हा परिषदेचा अभियंता मागील दीड वर्षापासून 'बिन पगारी फुल अधिकारी'