महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी वारी: कोरोनाच्या संकटातही भक्तांचा उत्साह कायम...

जुन्या जालन्यातील कासबा भागात असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि जालना जिल्ह्यातील प्रतिपंढरी म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. आनंदी स्वामी महाराजांची दरवर्षी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पालखी निघते.

anandi-swami-maharaj-yatra-in-jalna
कोरोनाच्या संकटातही भक्तांचा उत्साह कायम...

By

Published : Jul 1, 2020, 2:11 PM IST

जालना -कोरोनाचे संकट असतानाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवदर्शनाचा भक्तांमध्ये असलेला उत्साह कायम आहे. सरकारने फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी कडक निर्बंध घालून दिले आहेत. या निर्बंधांचे पालन करुन भक्त देवदर्शनासाठी मंदिराच्या रांगेमध्ये उभे आहेत. परंतु, पालखी मिरवणुकीचीची परवानगी न मिळाल्यामुळे शहरातील आनंदी स्वामी महाराज संस्थांच्या विश्वस्त मंडळींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पहाटे चार वाजताच पालखीला नगरप्रदक्षिणा करुन आणली.

कोरोनाच्या संकटातही भक्तांचा उत्साह कायम...
जुन्या जालन्यातील कासबा भागात असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि जालना जिल्ह्यातील प्रतिपंढरी म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. आनंदी स्वामी महाराजांची दरवर्षी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पालखी निघते. कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, कसबा, गांधीचमन अशा मुख्य रस्त्यांवरुन ही पालखी परत मंदिरांमध्ये विसर्जित होते.

मल्लखांब, लाठ्या-काठ्या, अशा प्रकारचे विविध मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक पालखीसमोर पहावयास मिळतात. एकीकडे भजनी मंडळी टाळ-मृदंगाच्या तालावर पावल्या खेळताना दिसतात. तर दुसरीकडे हरिनामाच्या जयघोषात अभंगाचे सूर कानी पडतात. या भक्तिमय वातावरणात रस्त्यावर काढलेल्या सुरेख रांगोळ्या भर घालतात. मात्र, हा सर्व सोहळा यावर्षी झालाच नाही. कोरोनामुळे या सर्व आनंदावर पाणी फिरले आहे. आनंदी स्वामी महाराज संस्थानच्या परंपरेनुसार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास काही ठराविक विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये पालखीला नगरप्रदक्षिणा करुन आणली.

त्यानंतर मंदिरामध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हातावर सॅनिटायझर देऊन रांगेमध्ये दर्शनासाठी सोडण्यात आले होते. हीच परिस्थिती विठ्ठल रुक्मिणी मंदिराची होती. खरे तर या दोन्ही मंदिरांची प्रवेशद्वारे बंद आहेत. मात्र, कसब्यातील विठ्ठल मंदिर हे मुख्य रस्ता असल्यामुळे भाविकांना रस्त्यावरुनच दर्शन घेता येते. त्यामुळे इथे गर्दीचाजास्त प्रश्न येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details