जालना - लॉकडाउनमुळे बरेच व्यवसाय बंद आहेत, तसाच गेली बऱ्याच दिवासांपासून नाभिक व्यवसायही बंद आहे. मात्र, किती दिवस दुकान बंद ठेवावेत असा प्रश्न आता नाभिक विचारत आहेत. रोजच्या जगण्याचे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. सरकारने आम्हला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा, आम्ही कुणाचीही परवाणगी न घेता आमचे दुकाने उघडू, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
परवानगी द्या अन्यथा दोन दिवसांनी दुकाने उघडू, नाभिक व्यावसायिकांचा इशारा - महाराष्ट्र नाभिक महामंडळ
किती दिवस दुकान बंद ठेवावेत असा प्रश्न आता नाभिक विचारत आहेत. रोजच्या जगण्याचे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. सरकारने आम्हला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही कुणाचीही परवाणगी न घेता आमचे दुकाने उघडू असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
'छोटे दुकानदार रस्त्यावर आले आहेत'
लॉकडाउन परिस्थितीमुळे बऱ्याच दिवसांपासून नाभिक समाजाची दुकाने बंद आहेत. यामध्ये कोणताही सामान्य माणूस दुकानाकडे जाऊ शकत नाही. परंतु, अधिकारी वर्गासह काही लोक या नाभिक मंडळींना जास्तीचे पैसे देऊन घरी बोलावतात आणि आपली दाढी-कटीन करतात. मात्र, छोटे दुकानदार, रस्त्यावर दुकान असलेल्या नाभिक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरसकट दुकाने सुरू करण्यास आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दुकाने बंद असल्यामुळे घर भाडे दुकान भाडे, साहित्य खरेदी करण्यासाठी घेतलेले बँकेचे कर्ज थकलेले आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे, अशा परिस्थितीत शासनाने मदत करण्याचे सोडून दिले आहे. तसेच, जे उपजीविकेचे साधन आहे तेही बंद आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकार्यांनी जर नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाही, तर समाज स्वतःहून दुकाने सुरू करेल, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने दिला आहे.