जालना - नेहमी गदारोळामुळे चर्चेत राहणारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी शांततेच्या वातावरणात पार पडली. सर्वच विषयांना सभागृहाने सर्वसंमती दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सभेदरम्यान अंबड रोडवर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या दुकानांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली होती.
अहो आश्चर्य! जालना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रस्ताव शांततेत मंजूर - jalna
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपमुख्य अधिकारी केशव कानपुडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपमुख्य अधिकारी केशव कानपुडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच कुठल्याही विषयावर वादंग न होता खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाला औषधी खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये देण्याची मंजुरी देण्यात आली. एका दैनिकाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती त्यासाठी झालेला ४ लक्ष रुपयांच्या खर्चालाही यावेळी सभागृहाने मान्यता दिली. तसेच, महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट आणि इस्कॉन यांच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी नगरपालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सकस आहाराला सभाग्रहाने मंजुरी दिली.
या सभेतील महत्वाच्या निर्णयांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या ३० वर्षांपूर्वीच्या जलकुंभाची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे, याबाबत येणाऱ्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. दरम्यान, जालना-अंबड रोडवर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला शेडच्या पत्रांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक दुकानांना नगरपालिकेने परवानगी दिली आहे काय? तसेच, या दुकानांसाठी ४ ते ८ हजार रुपये प्रतिमहिना भाडे आकारले जाते आणि विशेष म्हणजे ही दुकाने नगरपालिकेने तयार केलेल्या सर्विस रोड उखडून तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याप्रकरणात महिन्याभराच्या आत आपण चौकशी करून अहवाल सादर करू, असे आश्वासन उपमुख्याधिकारी केशव कानडे यांनी दिले.