जालना- शहरातील बुद्ध विहार यांच्या वतीने रविवार दिनांक १० मार्चला देवमूर्ती (ता.जालना) येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आज आयोजकांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
जालन्यात रविवारी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद, होणार 'मानवतेचा जागर' - sunday
फक्त समाजबांधवांनी नव्हे तर सर्वच समाजातील नागरिकांनी मानवतेचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नागसेन बुद्धविहार देवमूर्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या या धम्म परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी, या परिषदेचे अध्यक्ष सुरेश डावकरे, राजेश ओ. राऊत, राम गायकवाड, मिलिंद धनेधर, राष्ट्रपाल जाधव, माधव पाखरे ,चंद्रकांत खरात, बी .बी. गाडेकर यांची उपस्थिती होती.
माहिती देताना सुरेश डावखरे म्हणाले, की सकाळी ९.३० वाजता धम्मध्वजारोहण १० वाजता बुद्धवंदना,११ वाजता स्वागत समारोह, ११.३० वाजता भन्ते यांना भोजनदान, १२ वाजता धम्म परिषदेतील ठराव मांडणी व मंजुरी, १२.३० वाजता मान्यवरांचे मनोगत आणि २.३० वाजता भन्ते त्यांचे धम्मदेशना असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या परिषदेचे उद्घाटन दुबई येथील उद्योजक भगवान गवळी तर अध्यक्ष म्हणून मुंबईचे प्रशांत पगारे यांचीही उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून डॉ. अशोक शीलवंत, विजयकुमार घडलींग, अंजना रेड्डी, विजय गवई, चंद्रकांत उजगरे, जे .बी. गवई, यशवंत भंडारे, नवरत्न मसाईवाल, पंजाबराव वर, यांची उपस्थिती राहणार आहे.
उपस्थित भन्ते त्यांमध्ये शाक्य पुत्र अंगुलीमाल महाथेरो, उपगुप्त महाथेरो ,करूनानंद थेरो,ज्ञानरक्षित ,सत्यपाल थेरो, आदींची उपस्थिती राहणार आहे. फक्त समाजबांधवांनी नव्हे तर सर्वच समाजातील नागरिकांनी मानवतेचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.