महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शौचालयाचे पैसे हडप, पानेगाव ग्रामपंचायतचा प्रताप, लाभार्थ्याचे चार दिवसापासून  उपोषण सुरू

शौचालयाचे लाभार्थी आसाराम भालेराव यांनी दिनांक सात फेब्रुवारी  रोज अंबडच्या गटविकास अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. यता त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामाचे अनुदान ग्रामपंचायत परस्पर हडप केल्याचा आरोप केला होता.

जालना जिल्हा परिषदेसमोर लाभार्थ्याचे चार दिवसापासून  उपोषण सुरू

By

Published : Jul 29, 2019, 11:49 PM IST

जालना - अंबड तालुक्यातील पानेगाव येथील ग्रामस्थ आसाराम बापूराव भालेराव यांच्या शौचालयासाठी शासनातर्फे मिळणारे अनुदान ग्रामपंचायतने हडप केले आहे. ते अनुदान मिळावे किंवा शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी भालेराव यांनी जिल्हा परिषदेसमोर 25 तारखेपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र, हे उपोषण सोडले असल्याची अफवा ग्रामपंचायतच्या वतीने पसरविली जात आहेत. त्यामुळे उपोषण कर्त्याला आणखीनच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

जालना जिल्हा परिषदेसमोर लाभार्थ्याचे चार दिवसापासून उपोषण सुरू आहे

शौचालयाचे लाभार्थी आसाराम भालेराव यांनी दिनांक सात फेब्रुवारी रोज अंबडच्या गटविकास अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. यता त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामाचे अनुदान ग्रामपंचायत परस्पर हडप केल्याचा आरोप केला होता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी आंबड यांनी संबंधित ग्रामसेविका यांना नोटीस बजावली होती.

भालेराव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायत स्तरावर शौचालयाची पाहणी करण्याकरिता पाठविण्यात आले होते. त्यांच्या अहवालानुसार भालेराव यांचे शौचालय अपूर्ण असल्याचे दिसून आले. तसेच इतरही सात ते आठ वैयक्‍तिक शौचालय अपूर्ण आहेत. ती का अपूर्ण राहिली आहेत या बाबतचा खुलासा तात्काळ करावा तसेच ग्रामपंचायत अंतर्गत बेसलाईनमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले आहे काय? याविषयी देखील त्वरित माहिती कळवावी. सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ती झाल्यास आपल्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा आदेश देण्यात आला होता. मात्र बीडीओच्या या पत्राला संबंधित ग्रामसेविकेने कचऱ्याची टोपली दाखवली आणि लाभार्थ्याला उपोषण करण्यास भाग पाडले.

लाभार्थी आसाराम भालेराव यांची रविवारी प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सोमवारी पुन्हा ते उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून ग्रामस्थांनी देखील आज उपोषणाच्या ठिकाणी हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details