महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदनमध्येही 'शाहीनबाग'; आंदोलक महिलांना नुरी अजीज साहिबांचे मार्गदर्शन - भोकरदन जालना न्युज

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोकरदनमध्ये २६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये दररोज विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले जात आहे.

NRC CAA bhokardan jalna
आंदोलनात सहभागी महिलांना नुरी अजीज साहिब यांनी केले मार्गदर्शन

By

Published : Feb 6, 2020, 1:19 PM IST

जालना - जिल्ह्यातील भोकरदन येथे मुस्लीम बांधवांच्या वतीने नगरपरिषदेजवळ मंडप उभारून 'शाहीनबाग' भरवण्यात आले आहे. यावेळी दिल्लीमधील शाहीनबागेतील आंदोलनात सहभागी असणाऱ्या मुस्लीम महिला व्याख्याता नुरी अजीज साहिब यांनी भोकरदन येथे येऊन मार्गदर्शन केले.

आंदोलनात सहभागी महिलांना नुरी अजीज साहिब यांनी केले मार्गदर्शन

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भोकरदनमध्ये २६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये दररोज विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी नुरी अजीज साहिब या आल्या होत्या. त्यांनी मुस्लीम समाजातील महिलांना आणि नागरिकांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेख शफीक, नुजेर शाह, गज्जू कुरेशी, अजर पठाण यांच्यासह मुस्लीम समाजातील महिलांना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details