महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एअर स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर अति संवेदनशील ठिकाणाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी - एअर स्ट्राइक

दोन दिवसांपासून जालना शहरातील अति संवेदनशील ठिकाणांची बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने पाहणी सुरू केली आहे . यामध्ये इंदेवाडी येथे असलेले उपग्रह केंद्र, जालना रेल्वे स्थानक, बस स्थानक, दूरदर्शन केंद्र, औद्योगिक वसाहतीमधील २२० केव्ही चे आणि कन्हैया नगर येथील १२३ केव्हीचे वीज केंद्र यांची तपासणी या पथकाने केली.

एअर स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर अति संवेदनशील ठिकाणाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

By

Published : Feb 28, 2019, 11:21 AM IST

जालना - भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत असलेला तणाव, भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यावर केलेला एयर स्ट्राइक. या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी हाय अलर्ट देण्यत आला आहे. याची दखल जालना पोलिसांनी घेतली असून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे . पोलिसांनी अति संवेदनशील ठिकाणांची बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून पाहाणी सुरू केली आहे.

एअर स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर अति संवेदनशील ठिकाणाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

दोन दिवसांपासून जालना शहरातील अति संवेदनशील ठिकाणांची बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने पाहणी सुरू केली आहे . यामध्ये इंदेवाडी येथे असलेले उपग्रह केंद्र, जालना रेल्वे स्थानक, बस स्थानक, दूरदर्शन केंद्र, औद्योगिक वसाहतीमधील २२० केव्ही चे आणि कन्हैया नगर येथील १२३ केव्हीचे वीज केंद्र यांची तपासणी या पथकाने केली. तेथील सुरक्षारक्षकांना योग्य त्या सूचना देऊन सतर्क राहण्याचे ही बजावून सांगण्यात आले आहे.

एकंदरीत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यामधील वादग्रस्त भाषणबाजी करणारे समाजकंटक, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे समाजकंटक ,यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. चिथावणीखोर भाषणे आदी प्रकारचे समाजविघातक कृत्ये करणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. याचसोबत जिल्ह्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी काही परराज्यातून विद्यार्थी आलेले असतील तर त्यांच्याही सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत. यामुळे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना पूर्ण सुरक्षा मिळेल याची खात्री ठेवावी असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक चैतन्य एस यांनी केले आहे. रेल्वे स्थानक बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी लॉज, हॉटेल वर काही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्यांची माहिती पोलीस प्रशासनाला तरी ती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले .

दरम्यान अद्याप कोणत्याही जास्त कुमक मागितली नसून तशी आवश्यकता पडल्यास मागविली जाईल असे सांगून पोलीस प्रशासन शासनाने दिलेल्या आदेशानुसार पूर्णपणे सतर्क झाले आहे असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details