महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, मराठा आरक्षणाला दर्शवला पाठिंबा - Maratha Reservation

Actor Sayaji Shinde Meets Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत सरकारला धारेवर धरलं आहे. तर आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं सांगितलं.

Actor Sayaji Shinde Meets Jarange Patil
अभिनेता सयाजी शिंदे यांचा जरांगे पाटलांना पाठिंबा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 7:57 PM IST

अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

जालना Actor Sayaji Shinde Meets Jarange Patil :मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळं येत्या २० जानेवारीपासून जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली.

मुंबईतील मोर्चाला आमचा पाठिंबा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना सयाजी शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये येण्यास मज्जाव करणार का: सरकार मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्याअगोदरच काय निर्णय घेणार किंवा मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यास मज्जाव करणार का? याकडं राज्यभरासह देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेला कळवलं आहे की, मराठा समाज बांधवांची योग्य ती व्यवस्था करा. स्वच्छतेची, डॉक्टरांची व्यवस्था करा, अशा सूचना मुंबई महानगरपालिकाला दिल्या आहेत. आता महानगरपालिका काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आंदोलनाच्या तयारीला लागा: येत्या 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार आहे. 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या तयारीला लागा, मराठ्यांनी जर मुंबईकडे कूच केली तर ते माघारी फिरणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबईतून परत फिरणार नाहीत. देव जरी आडवा आला तरी आम्ही माघारी फिरणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हेही वाचा -

  1. प्रभू श्रीरामचंद्रानं केंद्र, राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगे पाटलांचं साकडं
  2. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचं काम बिनचूक व्हावं; मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
  3. राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक, विविध विषयावर चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details