जालना - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मुलांच्या हस्ते चिट्टी पाठविणे तरुणाला महाग पडले आहे. दोन वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
काय आहे प्रकरण -
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ या गावचा तरुण सतीश समाधान नेमाने (वय 26 वर्ष) याने 2 एप्रिल 2019 रोजी गावातीलच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला चिठ्ठी पाठवली होती. ही मुलगी दुपारी एक वाजता शाळेतून घरी आल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत घरी टीव्ही पाहत होती आणि त्याच वेळी सोमीनाथ गणेश धरणवाल याने दारात येऊन या मुलीकडे चिट्टी दिली आणि सांगितले की, सतीश नेमाने यांनी ही चिठ्ठी दिली आहे. सतीशला तू आवडतेस आणि तुला एकांतात भेटावयाचे आहे, असा निरोप दिला असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहून ही मुलगी खूप घाबरली तसेच यापूर्वी देखील सतीशने तिचा शाळेपासून घरापर्यंत पाठलाग देखील केलेला होता.