महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, पती-पत्नीसह अन्य एक जण गंभीर जखमी - Bike accident in Jalna

जालना शहरातील मंठा बायपास रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

two-two-wheeler-accident-in-jalna
जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात

By

Published : Dec 26, 2019, 9:01 PM IST

जालना - जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पत्नीला सोडण्यासाठी जाणाऱ्या पतीच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात या पती-पत्नीसह दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली.

जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात

जालना येथून 10 किलोमीटरवर खरपुडी हे गाव आहे. या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मनीषा सतीश देशपांडे या कार्यरत आहेत. सोनल नगर येथे राहणाऱ्या मनीषा देशपांडे यांना सोडण्यासाठी सतीश शरद देशपांडे हे जात होते. याच वेळी मंठा बायपास रोडवर खरपुडीकडे वळत असतानाच समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये देशपांडे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगून 72 तासांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे. एम एच 21 ए वाय 59 51 ही महिंद्रा कंपनीची दुचाकी होती, तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक बांधकाम करणारे कामगार होते. ते होंडा शाइन mh 21 डीजे 8095 या वाहनावरून प्रवास करत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details