जालना -बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील शेतवस्तीवर एका नराधमाने कोंबड्यांना दाने टाकत असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अन्वर खान कादर खान असे नाव असून नराधम फरार आहे.
महिलांवरील अत्याचार थांबेना... जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार - badanapur
बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील शेतवस्तीवर एका नराधमाने कोंबड्यांना दाने टाकत आसलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अन्वर खान कादर खान असे नाव असून नराधम फारार आहे.
काल (मंगळवार) दुपारच्या वेळी अन्वर खान हा पिडितेच्या शेतवस्तीवरील घरी गेला होता. तेथे कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने पिडित मुलीला केस धरून तीच्याच घरात नेऊन अत्याचार केला. पिडीत मुलीने घडलेला प्रसंग आपल्या आईला सांगितला. त्यावरून बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये अन्वर खान कादर खान याच्यावर बलात्कार बाललैंगिक आत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. काल आरोपी फरार होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी नराधमास जेरबंद केल्याचे समजते.