जालना - केंद्र सरकार जोपर्यंत किमान वेतन जाहीर करत नाही, तोपर्यंत राज्य सरकारकडून आशा स्वयंसेविकांना १० हजार रुपये तर, गटप्रवर्तकला १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसेच प्रत्येकीला रोगांच्या सर्वेसाठी व गृह भेटीसाठी किमान २० रुपये प्रति कुटुंब मोबदला देण्यात यावा. या मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी आज (बुधवार) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
आशा स्वयंसेविकांचा जालना जिल्हा परिषदेवर मोर्चा - अंबड चौफुली
जालन्यातील आशा स्वयंसेविकांनी आज (बुधवार) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. अंबड चौफुली येथून सुरु झालेला मोर्चा जिल्हा परिषदेवर जाऊन धडकला.आशा स्वयंसेविकांना १० हजार रुपये तर, गटप्रवर्तकला १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
अंबड चौफुली येथून सुरु झालेला मोर्चा जिल्हा परिषदेवर जाऊन धडकला. शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती लोंढे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की आशांना विनामोबदला कोणत्याही कामाला लावू नये. तसेच त्यांना काढून टाकण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने काम करून न घेता सन्मानाची वागणूक देण्यात यावी. गटप्रवर्तकासाठी टेबल, खुर्ची, कपाट आणि स्वतंत्र संगणकाची व्यवस्था करण्यात यावी. आशा व गटप्रवर्तक यांना ५०० रुपये मोबाईल भत्ता देण्यात यावा, अशा मागण्यांचा यामध्ये समावेश होता.