महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस अधिकाऱ्यापासून जीवाला धोका; 'आप'च्या कार्यकर्त्याचा आरोप - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय

पुणेगाव येथील अंभोरे यांनी गायरान प्रकरणी 18 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणादरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

उपोषणादरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

By

Published : Aug 27, 2019, 3:01 PM IST

जालना- पुणेगाव येथील अंभोरे यांनी गायरान प्रकरणी 18 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणादरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा प्राध्यापक सुभाष देठे यांनी दिला आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्राध्यापक सुभाष देठे यांच्यासह या पार्टीचे कार्यकर्ते बळीराम कोलते, फिरोज बागवान, मुकुल निकाळजे व तनुज बाहेती हे उपस्थित होते.

उपोषणादरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने विविध राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणण्यात येत आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच सुधीर खिरडकर यांना भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांनी सुपारी दिलेली आहे, असा आरोप यावेळी 'आप'च्या वतीने करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना हे उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे सांगितले होते. मात्र, हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येत असल्याचे पाहून त्यांनी मारहाण केली, असे सुभाष देठे म्हणाले. तसेच उपोषणकर्ते अंभोरे यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात तक्रार नोंदवूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसून, उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे, असे प्राध्यापक देठे यांनी म्हटले आहे. तसेच खिरडकर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करून सुधीर खिरडकर यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण लोकशाही पद्धतीने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

संबंधित प्रकरणासंदर्भात पोलीस अधीक्षक चैतन्य यांना विचारल्यावर, काम करताना अधिकाऱ्यांना कधीकधी कठोर व्हावे लागते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केलेली कारवाई देखील कामाचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details