भोकरदन (जालना) - तालुक्यातील वाडी बु. येथील 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना मंगळवार (दि. 11 मे) रोजी सकाळी 6 वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. आकाश राजेंद्र सोनवणे (वय 21 वर्षे रा. वाडी बुद्रुक), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या - जालना आत्महत्या बातमी
भोकरदन तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (दि. 11 मे) सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
मिळालेले माहिती अशी की, आकाश हा सोमवारी (दि.10 मे) रात्री शेतात झोपण्यासाठी घरातून गेला होता. मंगळवारी (दि.11 मे) सकाळी 6 वाजेच्या सुमारास काका सुभाष सोनवणे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले असता त्यांना आकाशचा मृत्यदेह आंब्याचा झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. काकाने तत्काळ पोलिसांना व नागरिकांना कळविले त्यानंतर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, वाडी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, काका, एक भाऊ, असा परिवार आहे. या घटनेचा भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी बालकांचे लसीकरण - टोपे