जालना- भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील एका तरुणाने राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री गळफास घेउन आत्महत्या केली आहे. गजानन जिजाराव सहाने (वय,२५) असे या तरुणाचे नाव आहे.
सोयगाव देवी येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या...कारण अस्पष्ट - bhokardan suicide news
भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील एका तरुणाने राहत्या घरी मंगळवारी मध्यराञी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गजानन जिजाराव सहाने असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस अधिक तपास करत आहे.
भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गावापासुन काही अंतरावर असलेल्या परिसरात गजाननचे शेत आहे. मंगळवारी मध्यरात्री कुणालाही न सांगता तो घरातुन बाहेर पडला. मात्र, बुधवारी सकाळी शेतात गजाननने गळफास घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबद्दल परिसरातील नागरिकांनी कुंटुबियांना माहीती दिली. गजानन हा मनमिळावु स्वभावाचा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गजानच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुंटुबियाना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई,भाऊ,दोन बहीनी असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
हेही वाचा- 'राजगृह' तोडफोड प्रकरण : दुसऱ्या आरोपीला कल्याणमधून अटक