जालना -सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रूग्ण संख्या झपाट्याेने वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. गरीबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरातील गोरगरीबांना सामजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा यांच्यावतीने २५० जीवनावश्यक किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यामध्ये साखर, गोडतेल, हरबरा डाळ, पोहे, साबण, चहापावडर, मीठ पुडी अशा सात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
कोरोनामुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून उपसामार होण्याची भिती आहे. कोणी बडा नेता मदत करेल का? अशी आशा मनात धरून ते मदतीची वाट बघत आहे. मात्र, कोणीही या गरीब नागरिकांना मदत करण्यास पुढे येताना दिसून नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे.