जालना - पोलीस आल्याचे पाहून एका कॉलनीत दारूने भरलेले वाहन सोडून चालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी दहा लाखांच्या विदेशी दारुसह चार लाखांचे पिकअप असा एकूण 14 लाख79 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना : विदेशी दारूने भरलेला पिकअप सोडून चालक फरार; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त - jalna illegal liquor sell
तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस गळवारी रात्री मंठा चौफुलीवर गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना देशी दारूने भरलेला एक पिकअप जालन्यात येत असल्याची माहीती खबर्यामार्फत मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून सिंदखेड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान पाठलाग करून हे वाहन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची गाडी पाहताच पिकअप चालकाने हे वाहन पुष्पकनगरमध्ये टाकले आणि वाहन सोडून पळून गेला.
तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईन फकरुद्दिन खान आणि अन्य दोन सहकारी मंगळवारी रात्री मंठा चौफुलीवर गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना देशी दारूने भरलेला एक पिकअप जालन्यात येत असल्याची माहीती खबर्यामार्फत मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून सिंदखेड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान पाठलाग करून हे वाहन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची गाडी पाहताच पिकअप (क्र. एमएच 21 बीएच 0684) चालकाने हे वाहन पुष्पकनगरमध्ये टाकले आणि वाहन सोडून पळून गेला.
या वाहनातून 8 लाख 92 हजार रुपयांची विदेशी दारू, तर, इतर 1लाख 53 हजारांची दारू, 17 हजार 500 रुपयांची स्कॉच आणि अन्य काही विदेशी कंपन्यांचे दारू बॉक्स पकडले आहेत. त्यासोबत 4 लाख रुपयांचे पिकअप वाहनही जप्त केले आहे. याप्रकरणी वाचक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईन खाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू कुठून आली आणि कुठे जात होती याचा तपास पोलीस घेत आहेत.