जालना -अज्ञात व्यक्तींनी चार लाख रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना २९ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली. एका व्यावसायिकाने ही बॅग पुण्यातील त्याच्या नातेवाईकाला देण्यासाठी त्याच्या नोकराकडे दिली होती.
माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हेही वाचा -सकारात्मक! बारामतीतील ८७ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात
जुना मोंढा भागात राहणारे रामलाल मोतीलालजी परमार यांचा माऊली स्टील सेंटर या नावाने व्यवसाय आहे. 29 एप्रिलला रात्री परमार यांनी त्यांचे नोकर अजय उर्फ जनार्धन लांडगे याच्या जवळ चार लाख रुपयांनी भरलेली बॅग देऊन पुणे येथील त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार नोकर लांडगे हा संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास किरण पेट्रोल पंपाच्या बाजूला उभे असलेल्या ट्रॅव्हल्सने पुण्याला जाण्यासाठी उभा होता. याच दरम्यान तीन अज्ञातांनी येऊन त्याच्या जवळील रक्कम असलेली बॅग घेऊन पोबारा केला.
बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या 800 नोटा भरलेल्या होत्या. दरम्यान, हातातील बॅग हिसकावून पळालेले हे तिघे जण मोटारसायकलवर बसून बसस्थानकाकडे पळून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान याप्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा -लसीअभावी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद; नागरिकांना मनस्ताप