महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरण्यासठी आठशे मिलीमीटर पावसाची आवश्यकता - पाणी

मागील वर्षी जालना जिल्ह्यातील एकूण 64 धरणांमध्ये त्यापूर्वी पडलेल्या पावसाचे 13.70 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. मागील वर्षी पाऊस न पडल्यामुळे हा साठा पूर्णपणे मार्च महिन्यातच संपला आणि धरणे कोरडीठाक पडली.

जालना

By

Published : Jun 11, 2019, 2:49 PM IST

जालना- जिल्ह्यामध्ये असलेले 7 मध्यम प्रकल्प आणि 57 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आठशे मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. मान्सून सध्या भारतात दाखल झाला असून लवकरच महाराष्ट्रातदेखील तो चांगला बरसेल, अशी आशा आहे.

मागील वर्षी जालना जिल्ह्यातील एकूण 64 धरणांमध्ये त्यापूर्वी पडलेल्या पावसाचे 13.70 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. मागील वर्षी पाऊस न पडल्यामुळे हा साठा पूर्णपणे मार्च महिन्यातच संपला आणि धरणे कोरडीठाक पडली. या तलावांमध्ये आता एक थेंबही पाणी शिल्लक नाही. पावसाळ्याला सुरुवात होऊन चार दिवस झाले, मात्र पावसाचा अजून थेंबही नाही. असे असताना जालना जिल्ह्यांमधील हे 64 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आठशे मिलीमीटर पावसाची आवश्कता आहे.

धरणे सक्षम भरण्यासाठी आठशे मिलिमीटर पावसाची आवश्यकता

यासोबतच ही सर्व धरणे मातीची आहेत. या धरणाला पाणी सोडण्यासाठी कुठलेही लोखंडी दरवाजे नाहीत. त्यामुळे या धरणांची देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील कमी येतो. तसेच या धरणाच्या सुरक्षिततेबाबत दरवर्षी लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्यामार्फत नाशिक येथे असलेल्या धरण सुरक्षा समितीला अहवाल पाठवला जातो. या अहवालात जर काही धोका आढळला तर धरण सुरक्षा समितीचे अधिकारी येऊन धरणाची पाहणी करून त्यामध्ये दुरुस्ती सुचवतात. मात्र, आपल्याकडील हे प्रकल्प मातीची असल्यामुळे त्यांना तूर्तास कुठलाही धोका नसल्याचा अहवाल धरण सुरक्षा समितीने दिला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात आठशे मिलीमीटर पाऊस झाला तरीही ही धरणे सक्षमपणे काम करतील, असा विश्वास मध्यम व लघु प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता वाय. एम. कडलग यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details