जालना - जानेवारी महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्पष्ट झाला आहे. जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असून, निवडणुकीत एकूण 3 हजार 997 जागांसाठी 8 हजार 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हेही वाचा -इब्राहिमपूर येथे शेततळ्यात बुडून तरुणीचा मृत्यू; डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे
475 ग्रामपंचायतीत 1 हजार 232 प्रभाग असून, 8 हजार 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जालना तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली आहे. एकूण 30 भागांमधून 38 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये नसडगाव, तांदुळवाडी बुद्रुक, घोडेगाव आणि तांदुळवाडी खुर्द या गावांचा समावेश आहे.