जालना - राज्यघटनेला 70 वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने हे वर्ष उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (शनिवारी) विभागाच्या वतीने "आई" या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील संस्कार प्रबोधनी विद्यालयामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव रेणुकादास पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यघटनेला 70 वर्ष पूर्ण : जालन्यात सामाजिक न्याय विभागातर्फे विविध स्पर्धांना सुरूवात
सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. या स्पर्धेतून विजेते होणाऱ्या स्पर्धकाला न्यायमूर्तींच्या हस्ते गुणानुक्रमे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. या स्पर्धेतून विजेते होणाऱ्या स्पर्धकाला न्यायमूर्तींच्या हस्ते गुणानुक्रमे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. आज शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राम भाले, दीपक खुरसले, श्रीमती दाभाडकर, श्री भुतेकर, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ, सहशिक्षक रामदास कुलकर्णी, किरण धुळे, श्रीमती कागबट्टी ,शिक्षक तडवी आदींची उपस्थिती होती. शिल्पा होळकर यांनी आभार मानले.
हेही वाचा -भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात