जालना - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घनसांगी तालुक्यामध्ये राज्यात बंदी असलेला गुटका साठवून ठेवलेल्या एका गोदामवर धाड टाकत ७ लाख ११ हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जाळून नष्ट करण्यात आला.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना घनसांगी तालुक्यातील मौजे राणी उंचेगाव येथे उंचेगाव ते घनसावंगी या रस्त्यावर असलेल्या अक्कस एक्वा वॉटर फिल्टर प्लांटच्या गोदाममध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने या शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास या गोदामावर धाड टाकली. त्यावेळी तिथे अब्दुल रियाज अब्दुल रशीद शेख (35) हा आरोपी उपस्थित होता. या गुटख्याविषयी त्याला विचारले असता त्याने हा गुटका विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली.