महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात पावसाने आणली 60 टक्के पिकाला अवकळा

538 गावांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण गावातील पाच लाख दहा हजार 658 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यापैकी 2 लाख 6 हजार 76 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पावसाने आणली 60 टक्के पिकाला अवकळा

By

Published : Nov 8, 2019, 5:30 PM IST

जालना - जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसाने 60 टक्के पिकांवर अवकळा आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आत्तापर्यंत केलेल्या पंचनाम्यानुसार हा अहवाल समोर आला आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले हे क्षेत्र आहे.

पावसाने आणली 60 टक्के पिकाला अवकळा

हेही वाचा-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी - सुधीर मुनगंटीवार

जालना जिल्ह्यामध्ये एकूण ४ लाख 33 हजार हेक्‍टर क्षेत्रावर या अवकाळीचा परिणाम झाला आहे. जालना तालुक्यातील 151, बदनापूर 92, भोकरदन 157, जाफराबाद 101 , अंबड 138, घनसावंगी 117, मंठा 111, आणि परतूर 97, अशा एकूण 964 गावांना या अवकाळीचा फटका बसला आहे. 5 लाख दहा हजार 658 शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

538 गावांच्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या शेतकऱ्यांची 2 लाख 6 हजार 76 एवढी आहे. जिल्ह्यामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र दोन लाख 49 हजार 463 हेक्टर एवढे आहे. एकूण परिस्थिती 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत जालना जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांमध्ये 964 गावांना या अवकाळीचा फटका बसला होता. त्यामधील 538 गावांची नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण गावातील पाच लाख दहा हजार 658 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यापैकी 2 लाख 6 हजार 76 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details