महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाईच्या पोटातून काढल्या 60 किलो कॅरीबॅग - 60 kg carrybag removed from cow's stomach

22 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या 60 किलो प्लास्टिक कॅरीबॅग गायीच्या पोटातून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. सुंदरराव कुलथे यांची गाय गेल्या आठ दिवसापासून चारा खात नसल्यामुळे डॉक्टरानी शस्त्रक्रिया केली असता हा प्रकार समोर आला.

60 kg carrybag removed from cow's stomach
अ ब ब! गाईच्या पोटातून काढल्या 60 किलो कॅरीबॅग

By

Published : Jan 12, 2021, 8:56 PM IST

जालना -प्लास्टिकच्या कॅरीबॅग चे दुष्परिणाम वाढतच आहेत. त्यामुळे 22 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी आलेली आहे. असे असतानाही बाजारामध्ये सर्रास या कॅरीबॅगचा वापर होत आहे, आणि याचा दुष्परिणाम निष्पाप जनावरांना भोगावा लागत आहे. अशाच एका गाईवर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिच्या पोटातून साठ किलो कॅरीबॅग काढल्याआहेत.

अ ब ब! गाईच्या पोटातून काढल्या 60 किलो कॅरीबॅग

आठ दिवसापासून गाय खात नव्हती चारा -

जालना शहरातील काद्राबाद भागात राहणाऱ्या सुंदरराव कुलथे यांची गाय गेल्या आठ दिवसापासून चारा खात नव्हती.त्यामुळे त्यांनी या गाईला तपासण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले .आणि तिला तपासल्यानंतर डॉक्टर अमित कुमार दुबे यांनी गाईच्या पोटात काही तरी असल्याचा निष्कर्ष व्यक्त काढला. कुलथे यांना गाईची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. कुलथे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लगेच शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. पाहता पाहता गाईच्या पोटा मधून बाजारात बंदी असलेल्या सुमारे 60 किलो कॅरीबॅग निघाल्या .

वर्षभरापासून साचल्याचा निष्कर्ष -

या गायीच्या पोटात निघालेल्या कॅरीबॅग या मागील वर्षभरापासून थोड्या-थोड्या करत साठल्या असल्याचा निष्कर्ष डॉक्टर अमित कुमार दुबे यांनी व्यक्त केला आहे. जनावर जर चारा खात नसेल तर त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तपासून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जनावरांच्या पोटात अशा पद्धतीने जाते कॅरीबॅग -

प्राण्यांमध्ये गायी सोबत भावनिक नाते जोडलेले आहे. त्यामुळे रस्त्यांवर सर्वात जास्त दिसणाऱ्या प्राण्यांमध्ये गाई चा समावेश आहे. गाईचे मालक देखील गाईला रस्त्यावर चरण्यासाठी मोकळे सोडून देतात. परिसरातील नागरिक या गाईला घरामध्ये उरलेले अन्न, पालेभाज्यांची उरलेली देठे, काढून टाकलेले भाग गाईला खाऊ घालतात. त्यापूर्वी हे सर्व एका कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवतात आणि तशीच कॅरीबॅग या गाईसमोर ठेवतात . जनावरे ती कॅरीबॅग खाऊन टाकतात आणि अन्नपदार्थाचे रवंथ होते. मात्र या कॅरीबॅग ची झीज होत नाही, आणि ती रवंथ होत नाही. त्यामुळे ती तशीच पोटात पडून राहते. अशा प्रकारच्या कॅरीबॅग दिवसेंदिवस वाढत जातात आणि एक दिवस जनावरांचा, गायीचा जीव घेण्यासाठी या कॅरीबॅग कारणीभूत ठरतात. त्यामुळे मालकांनी आपल्या गाई मोकाट सोडू नये. मोकाट गाईंना देखील नागरिकांनी कॅरीबॅगमध्ये हे अन्नपदार्थ न देता कागदावर किंवा भांड्यांमध्ये ते खाऊ घालावेत असे आवाहनही डॉक्टर अमित कुमार दुबे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details