जालना- भोकरदन तालुक्यातील नांजा येथील सहा वर्षीय चिमुकल्याचा भोकरदन-जालना रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुद्रा गणपत मोरे, असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
भोकरदनमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, 6 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू - 6-year-old boy killed in accident in Bhokardan
भोकरदन तालुक्यातील नांजा येथील रहिवासी गणपत कुंडलिक मोरे (वय 31) हे आपली पत्नी सविता मोरे (वय 25) व मुलगा रुद्रा यांच्यासोबत नांजा येथून नाळणी खु. येथे नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली.
हेही वाचा - ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
याबाबत अधिक माहिती अशी, की भोकरदन तालुक्यातील नांजा येथील रहिवासी गणपत कुंडलिक मोरे (वय 31) हे आपली पत्नी सविता मोरे (वय 25) व मुलगा रुद्रा यांच्यासोबत नांजा येथून नाळणी खु. येथे नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला (एमएच-21-एएफ-1777) भरधाव ट्रकने (टी.एस. 04-युडी-1169) धडक दिली. यामध्ये रुद्रा मोरे याचा जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.