महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार, ७९ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवारांमध्ये 133 उमेदवार होते. त्यापैकी आता 79 उमेदवार राहिले आहेत.

जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार

By

Published : Oct 7, 2019, 9:06 PM IST

जालना -जिल्ह्यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघातून 54 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 79 उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार जालना विधानसभा मतदारसंघात असून त्यांची संख्या 32 आहे. त्यापैकी ४ महिला उमेदवार आहेत.

जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात वैध उमेदवारांमध्ये 133 उमेदवार होते. त्यापैकी आता 79 उमेदवार राहिले आहेत.

हे वाचलं का? - युतीत 'बंड'खोरांची लाट; एकमेकांविरोधात उभे 'ठाक'

मतदारसंघनिहाय माहिती -

  • मतदारसंघ वैध उमेदवार माघार घेतलेले उमेदवार रिंगणात असलेले उमेदवार
  1. परतूर 21 7 14
  2. घनसावंगी 27 14 13
  3. जालना 56 24 32
  4. बदनापूर 20 6 14
  5. भोकरदन 9 3 6

महत्त्वाच्या लढती -

  • मतदारसंघ लढत
  1. जालना शिवसेनेचे अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेसचे कैलास गोरंट्याल
  2. परतूर भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया
  3. भोकरदन भाजपचे संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे
  4. बदनापूर भाजपचे नारायण कुचे विरुद्ध राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, मनसेचे भोसले
  5. घनसावंगी राष्ट्रवादीचे राजेश टोपे विरुद्ध हिकमत उढाण

हे वाचलं का?- विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच जागांवर आपण समाधानी - रामदास आठवले

जालना विधानसभा -
आजच्या तारखेत शासनाच्या निकषानुसार ८ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. 32 उमेदवार असल्यामुळे 3 मतदान यंत्र लागणार आहेत. पहिल्या दोन मतदान यंत्रांवर उमेदवारांची नावे आणि तिसऱ्या मतदान यंत्रावर फक्त नोटाची बटन असतील. तीन मतदान यंत्र, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट मशीन अशी यंत्रणा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details