महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसआरपीएफ 'त्या' तुकडीला बोलावून दुसरी तुकडी पाठविणार; जालन्यातील 42 जवानांना कोरोनाची लागण - jalna corona update

कोरोनाची बाधा झालेल्या 33 जवानांच्या खात्यामध्ये प्रशासनाने प्रत्येकी एक लाख रुपये तातडीची मदत जमा केली आहे. ही मदत म्हणजे बिनव्याजी रक्कम असून, पुढील अठरा महिन्यांमध्ये ती कपात करण्यात येणार आहे. अशा टाळेबंदीच्या काळात जवानांच्या परिवारासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

42 srpf Soldie
एसआरपीएफ 'त्या' तुकडीला बोलावून दुसरी तुकडी पाठविणार; जालन्यातील 42 जवानांना कोरोनाची लागण

By

Published : May 6, 2020, 6:47 PM IST

जालना -राज्य राखीव पोलीस बल (गट क्रमांक 3), जालना मुख्यालयातून विविध ठिकाणी गेलेल्या जवानांपैकी 42 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मालेगाव येथे सर्वात जास्त लागण झाली आहे. आत्तापर्यंत 23 जवानांना लागण झाली होती आणि मंगळवारी रात्री आणखी दहा जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल आले आहेत. त्यामुळे आता ही संख्या 33वर जाऊन पोहोचली.

एसआरपीएफ 'त्या' तुकडीला बोलावून दुसरी तुकडी पाठविणार; जालन्यातील 42 जवानांना कोरोनाची लागण

दरम्यान, या तुकडीला परत बोलावून त्यांच्या ठिकाणी दुसरी तुकडी पाठविण्याच्या हालचाली राज्य राखीव पोलीस बलामध्ये सुरू झाले आहेत. जेणेकरून गेल्या अनेक दिवसांपासून मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या या तुकडीतील जवानांना थोडा आराम देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. कोरोनाची बाधा झालेल्या 33 जवानांच्या खात्यामध्ये प्रशासनाने प्रत्येकी एक लाख रुपये तातडीची मदत जमा केली आहे. ही मदत म्हणजे बिनव्याजी रक्कम असून, पुढील अठरा महिन्यांमध्ये ती कपात करण्यात येणार आहे. अशा टाळेबंदीच्या काळात जवानांच्या परिवारासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.

जालना येथे राज्य राखीव पोलीस बल (गट क्रमांक 3) मुख्यालय आहे. या मुख्यालयात 1 हजार 200 जवान कार्यरत आहेत. या जवानांच्या तुकड्या विविध ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक एफ तुकडी मुंबईला 19 एप्रिलला, बी तुकडी मालेगावला पाठवली होती. त्यामधील एकाही जवानाला कोरोनाची लागण नाही. मात्र, पाच एप्रिलला पाठवलेल्या 'सी' या तुकडीतील 33 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबई येथे पाच, मालेगाव येथे 33 आणि आणि अन्य दोन जवान जे रजा घेऊन आले होते आणि अन्य दोन जे घाबरून परत आले होते. अशा एकूण 42 जवानांना या कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, या जवानांशी मुख्यालयातून दररोज संपर्क साधला जातो. तसेच कोरोनाबाधित असलेल्या जवानांपैकी काही जवानांनी आपले परिवार लॉकडाऊनपूर्वीच इतरत्र हलविले आहेत. तर सध्या जे परिवार राज्य राखीव पोलीस दल दलाच्या निवासस्थानी राहतात यांची विशेष काळजी घेतले जात आहे. परिवार कल्याण निधी निधीमधून 15 लाख रुपये खर्च करून जीवनावश्यक वस्तूंचा साठा इथे करण्यात आला आहे. परिवारातील संबंधित जवान येथील विभागांमध्ये फोन करून घरच्या अडचणी सांगतात आणि येथील प्रशासन आवर्जून त्या अडचणी सोडविते. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनचे समादेशक अक्षय शिंदे यांनी या परिवाराची काळजी घेण्यासाठी ही योजना राबविली असल्याची माहिती सहाय्यक समादेशक गोविंद निजलेवार यांनी दिली आहे.

बाराशे जवानांपैकी 55 वर्षावरील सुमारे शंभर जवान इथे आहेत. ज्यांना जोखमीचे काम न देता सोपे आणि मुख्यालयातील काम देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details