जालन्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता - Jalna latest news
औरंगाबाद-जालना रस्त्यावरीवल बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे.
दोन ट्रकचा समोरासमोर अपघात
जालना : औरंगाबाद-जालना रस्त्यावरीवल बदनापूर जवळील गेवराई पाटीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. बदनापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Dec 29, 2019, 7:07 PM IST