महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gas Cylinder Blast : जालन्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी.. - गॅस सिलेंडरचा स्फोट

जालना शहराच्या जुना जालना भागातील सिद्धिविनायक नगरमध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याची ( Gas Cylinder Blast in Jalna ) घटना घडली. घटनेत 3 जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 20, 2022, 8:19 PM IST

जालना :शहरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. जालना शहराच्या जुना जालना भागातील सिद्धिविनायक नगरमध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याची ( Gas Cylinder Blast in Jalna ) घटना घडली.

3 जण भाजले -जुना जालना परिसरातील सिद्धिविनायकनगर येथील ताराबाई केशव जाधव (वय 65) यांच्या घरातील भाडेकरू मीना दिलीप घारे (वय 38) यांच्या घरातील गॅस सिलेंडर मधून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक लिकेज होऊन स्फोट झाला. यावेळी उडालेल्या भडक्यात ताराबाई जाधव आणि मीना दिलीप घागरे घारे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीररित्या भाजल्या आहेत. तर शेजारच्या किराणा दुकानातील अनंता दत्ता मंडलिक (वय 45) हे देखील गॅसच्या वाफेने भाजले आहेत.

जालन्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

जखमींवर उपचार सुरू - सदरील घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि परिसर परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. ताराबाई जाधव आणि मीना घारे या 60 टक्के भाजल्या असून त्यांना परिसरातील नागरिकांनी धावपळ करून जालन्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आवश्यक त्या उपचारासाठी त्यांना नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहे. या स्फोटात भाजलेल्या अनंता मंडलिक यांच्यावर मात्र जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details