जालना- निजामोद्दीन येथील मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातीलही अनेक बांधवांचा सहभाग होता. लातूरचे काही जमाती जालना जिल्ह्यातून जात असताना शहागड येथे चहा-पाण्यासाठी थांबले होते. हे जमाती शहागडहून पुढे लातूर येथे गेल्यानंतर त्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. त्यामुळे शहागड येथे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे येथील 26 जण तपासणीसाठी जालन्याच्या शासकीय रुग्णालयात पोलिसांच्या सांगण्यावरून दाखल झाले आहेत.
मरकज येथून परत येणाऱ्यांच्या संपर्कातील 26 जण घाटीमध्ये दाखल
लातूरचे काही जमाती जालना जिल्ह्यातून जात असताना शहागड येथे चहा पाण्यासाठी थांबले होते. हे जमाती शहागडहून पुढे लातूर येथे गेल्यानंतर त्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. त्यामुळे शहागडमधील 26 जण तपासणीसाठी जालन्याच्या शासकीय रुग्णालयात पोलिसांच्या सांगण्यावरून दाखल झाले आहेत.
गोंदी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार ते रुग्णालयात भरती झाले आहेत. दरम्यान, या रुग्णाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी यांनी सांगितले, की हे 26 जण निजामोद्दीनहून परतणाऱ्या जमातींच्या संपर्कात आले होते. मात्र, त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांच्यात काही आढळली नाहीत. तरीही त्यांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा -जालन्यात विलगीकरण कक्षातील कोरोना संभाव्य रुग्णाची प्रकृती गंभीर