महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalna fruit seller murder : डबलजीन भागात २५ वर्षीय फळविक्रेत्याची हत्या ; शहरात खळबळ - जालना फळविक्रेत्याची हत्या

शहरात अज्ञाताने एका 25 वर्षीय फळविक्री (Murder of 25-year-old fruit seller ) करणऱ्या तरुणाची हत्या केली आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन गुन्हा नोंदवला आहे. तसेच या घटनेच्या आरोपीचा तपास सुरु आहे.

भरत मुजमुले
भरत मुजमुले

By

Published : Jan 13, 2022, 12:53 PM IST

जालना : शहरात एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या ( fruit seller murder ) करण्यात आली आहे. तसेच अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. भरत मुजमुले (Fruit seller Bharat Mujmule ) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहरातील डबलजीन भागात (Murder in DoubleJin area ) ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेचा पंचनामा करताना पोलीस

मारेकऱ्यांनी आज भल्या पहाटे ही हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. फळविक्री करणाऱ्या तरुणाची अज्ञाताने हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कदीम जालना पोलिसांनी (Kadim Jalna Police ) घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागील कारण अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -Third Wave of Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झाली सुरुवात - आरोग्यमंत्री टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details