जालना - डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यांमधील ६ मदरशांना २०१७ साली २४ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. तर, २०१९ साठी अनुदान मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
सन 2017 - 18 मध्ये शासनाच्या अल्पसंख्यक विभागामार्फत हे अनुदान देण्यात आले होते. त्यामध्ये पायाभूत सुविधांसाठी १२ लाख रुपये, ग्रंथालयांसाठी १० हजार रुपये, शिक्षकांच्या मानधनावर ११ लाख ८० हजार रुपये देण्यात आले.
अनुदान घेणाऱ्या संस्थेमध्ये अरबिया झिया उल उलूम या संस्थेला ४ लाख २० हजार रुपये, फातेमा तू जोहरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी शहागड द्वारा संचलित मदरसा जामियातूल बनातम फातेमातू जोहरा या संस्थेला ४ लाख रुपये, मदरसा अरबिया दारुल उलूम जाफ्राबाद द्वारे संचलित मदरसा अरबिया दारुल उलूम जाफराबाद या संस्थेला ४ लाख २० हजार रुपये, आयशा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी घनसावंगी द्वारा संचलित मदरसा ए आयेशा लिलबताण यांना ४ लाख रुपये, शाह युलीवल्ला एज्युकेशनल अँड वेल्फेअर, आरत खेडा तालुका जाफराबाद द्वारे संचलित अरबिया इस्लाहुल बनात या संस्थेला ३ लाख ७० हजार रुपये, फरोगे उर्दू अखलती हिंद अमानुल्ला वाचनालय जालना द्वारे संचलित डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मॉडर्न अरबी दिन मग तब मगतब या संस्थेला ४ लक्ष ७० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.