महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदनापूर: निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला 206 कर्मचाऱ्यांची दांडी - Badnapur Latest News

बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली असून, निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आज झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात दोन्ही सत्रात ९९४ कर्मचाऱ्यांपैकी २०६ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक अधिकारी छाया पवार यांनी दिला आहे.

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला 206 कर्मचाऱ्यांची दांडी
निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला 206 कर्मचाऱ्यांची दांडी

By

Published : Jan 9, 2021, 5:53 PM IST

बदनापूर (जालना) -तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली असून, निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आज झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात दोन्ही सत्रात ९९४ कर्मचाऱ्यांपैकी २०६ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक अधिकारी छाया पवार यांनी दिला आहे.

६० ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदानासाठी निवडणूक विभागाकडून तालुक्यात 183 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी बदनापूर निवडणूक विभागाच्या वतीने तालुक्यातील शासकीय, खासगी शिक्षण संस्था, पंचायत समिती आदी कार्यालयातील 994 कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रांमध्ये निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

प्रशिक्षणाला अनेक कर्मचाऱ्यांची दांडी

ग्रामपंचायत निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार यांनी ९ जानेवारी रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात ९९४ कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र या दोन्ही सत्रात जवळपास २०६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले, त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने बदनापूर निवडणूक विभाग धास्तावले असून, गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तहसीलदारांनी दिले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

तहसील कार्यालयात आयोजित या प्रशिक्षणात तहसीलदार छाया पवार, नायब तहसिलदार रामेश्वर दळवी, अव्वल कारकून समद फारुकी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, बदनापूर तालुक्यात ६० ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून, निवडणूक विभागाची पूर्ण तयारी झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details