जालना- लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
निवडणुकीत २० उमेदवार असल्यामुळे मतदान करण्यासाठी मशीनही २ लागणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रीय पक्षांमधील उमेदवारांच्या यादीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे विलास अवताडे, भाजपचे रावसाहेब दानवे, बहुजन समाज पक्षाचे महेंद्र सोनवणे उभे आहेत. तर नोंदणीकृत राजकीय पक्षांमध्ये उत्तम राठोड (आसरा लोकमत पार्टी, निशानी बॅटरी), गणेश शंकर चांदोडे (अखिल भारतीय सेना, गॅस सिलेंडर), त्रिंबक बाबुराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष ,कप आणि बशी), प्रमोद बाबुराव खरात (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट, पार्टी एअर कंडिशनर), फेरोज अली (बहुजन मुक्ती पार्टी, खाट), डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी, शिट्टी) उभे आहेत.