जालना- कोरोनाबाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढतच आहे. जालन्यामध्ये आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जालन्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 15 झाली आहे.
जालन्यात आणखी एका कोरोनाबाधिताची भर, एकूण रुग्णांचा आकडा 15 - Jalna latest news
2 दिवसांपूर्वी मुंबईहून जालन्याला परतलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना भागात राहणारा हा तरुण आहे.
2 दिवसांपूर्वी मुंबईहून जालन्याला परतलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना भागात राहणारा हा तरुण आहे. मुंबईहून हा तरुण एका मालवाहू गाडीने जालन्यात आला होता. त्याच्यासोबत या वाहनात घनसांवगी तालुक्यातील अन्य काही सहप्रवासी होते, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 15 कोरोनाबाधितापैकी परतूर तालुक्यातील 1 महिला कोरोनामुक्त झाल्यामुळे तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 14 रुग्णांवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.