बदनापूर ( जालना ) - तालुक्यातील विविध नदी पात्रांतून अवैद्यरित्या वाळू उपसा करून त्याचा साठा वाळू माफियांकडून केला जात आहे. अशा दोन वाळू साठ्यांवर पोलीस व महसूल प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईत १४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
बदनापूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून लॉकडाऊनमध्ये विविध नदी पात्रांतून अवैधरित्या वाळू केला जात आहे. अनेकदा वाळूची वाहने प्रशासनाकडून पकडण्यात येत आहेत. यामुळे वाळू माफियांनी चोरून वाळू साठा करण्यास सुरूवात केली होती. वाळू माफियांनी तालुक्यातील रामखेडा व अकोला शिवारात मोठा वाळू साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सोमवारी (ता. १८ मे) सायंकाळी त्या साठ्यावर छापा टाकला.