जालना -जालनाकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णवाढ थांबली असून बाधा झालेले रुग्णांची उपचारानंतर घरवापसी सुरू झाली आहे. आज शनिवारी १२ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
दिलासादायक..! जालन्यात एकाच दिवशी १२ रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. आतापर्यंत जवळपास १२३ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी आतापर्यंत 44 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 79 रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. आतापर्यंत जवळपास १२३ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी आतापर्यंत 44 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 79 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जालनाकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात घरवापसी होणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लक्षात घेता आजाराची तीव्रता कमी होत असल्याचे दिसत आहे. सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.रुग्णांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. सर्वेश पाटील, डॉ. आशिष राठोड, कविता ढाकणे, समुपदेशक टी. आर. पाईकराव,आदी आरोग्य सहकारी परिश्रम घेत आहेत.