महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांद्याच्या शेतात अफूची लागवत; जालन्यात ११ लाखांची झाडे जप्त

कांद्याचे आणि आफूचेचे पीक जवळपास सारखेच असते. आणि दूरवरून या दोन्हीमधील फरक ओळखू येत नाही. त्यामुळे अशा पिकांमध्ये अफूची लागवड करणे सोपे जाते.

अफूची झाडे
अफूची झाडे

By

Published : Mar 1, 2021, 7:04 PM IST

जालना-जाफराबाद तालुक्यात असलेल्या गोपी गावच्या शिवारातून पोलिसांनी अकरा लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलीसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्यामुळे किती शेतकऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे हे अजून कळाले नाही.

कांद्याच्या पिकात अफूची लागवड
मौजे गोपी गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने कांद्याची लागवड केली होती. याच शेतात अफूच्या झाडाची लागवड करून ती चोरीच्या मार्गाने विकण्याचा त्याचा उद्देश होता. कांद्याचे आणि आफूचेचे पीक जवळपास सारखेच असते. आणि दूरवरून या दोन्हीमधील फरक ओळखू येत नाही. त्यामुळे अशा पिकांमध्ये अफूची लागवड करणे सोपे जाते. अफूच्या झाडाला गुन्हेगारी जगतामध्ये चांगली मागणी आहे. आणि भावही चांगला मिळतो. त्यामुळे असे पीक बेमालूमपणे घेतले जाते. मात्र काही जागरूक नागरिकांच्या मदतीमुळे शेतकऱ्याचे हे पितळ उघडे पडले आहे.


११ लाख रुपये किंमत
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे. जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत मोरे, कृषी विभाग, शासकीय पंच, महसूल विभागचे अधिकारी यांच्यासह गोपी शिवारात छापा मारला. त्यावेळी तेथील एका कांद्याच्या शेतात ४० किलो अफूची झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांनी सर्व अफूची झाडे ताब्यात घेतली असून घेऊन रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. प्रथम दर्शनी या झाडांची अंदाजीत ११ लाख रुपये सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details