जालना -लांडग्याने रात्री अचानक हल्ला करून ११ शेळ्यांचा फडशा पाडला. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी शिवारात ही घटना घडली. या घटनेत शेतकऱयाचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकाराने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वालसावंगी शिवारात लांडग्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - वालसावंगी लांडगा हल्ला
वालसावंगी येथील शेतकरी हरी वाघ यांनी त्यांच्या शेतातील शेडमध्ये १८ शेळ्या बांधल्या होत्या. शनिवारी पहाटेच्या सुमारास लांडग्याने जमीन उकरून शेडमध्ये प्रवेश करत शेळ्यांवर हल्ला केला. यात ११ शेळ्यांचा मृत्यू झाला तर तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. हरी वाघ हे शनिवारी सकाळी शेतात गेल्यानंतर ही घटना समोर आली.

गेल्या महिनाभरात लांडग्याने हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. मृत शेळ्यांचा पशुधन पर्यवेक्षक सोनवने यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन केले. या घटनेत शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले असून वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी. लांडग्यांचा लवकरातलवकर बंदोबस्त करावा, अशा मागण्या शिवारातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.