महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vaccination Maharashtra: येत्या 20 दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण- टोपे

ओमायक्राॅन (Omicron Variant) या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) मोठी खबरदारी घेतली जात आहे. दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी केली जात आहे येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्र 100 टक्के लसीकरणाचे उदिष्ठ (100 percent vaccination) साध्य करेल असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची व्यक्त केला आहे.

Rajesh tope
राजेश टोपे

By

Published : Dec 21, 2021, 3:18 PM IST

Updated : Dec 21, 2021, 3:43 PM IST

जालना: ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्राॅन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकादायक नाही असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे

सध्या राज्यात ओमायक्राॅनचे 54 रुग्ण असून प्रोटोकाॅलनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे. त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांंचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण होईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Dec 21, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details