महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corruption Allegation on Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा - जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचा आरोप

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरसह विविध साहित्यांची खरेदी ( corruption in ventilator purchase in Jalgaon ) करण्यात आली. यावेळी कुठल्याही प्रकारचे लेखापरीक्षण झाले नव्हते. सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती (RTI activist Dinesh Bhole ) मिळविली. त्यामधून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्याचा भाजपकडून दावा करण्यात येत आहे.

माधुरी अत्तरदे आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण
माधुरी अत्तरदे आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण

By

Published : Feb 9, 2022, 5:19 PM IST

Updated : Feb 9, 2022, 6:38 PM IST

जळगाव-कोरोना काळात जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil scam ) यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी अत्तरदे अत्तरदे यांनी केला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी बुधवारी माधुरी अत्तरदे, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले ( Madhuri Attarde hunger strike ) आहेत.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरसह विविध साहित्यांची खरेदी ( corruption in ventilator purchase in Jalgaon ) करण्यात आली. यावेळी कुठल्याही प्रकारचे लेखापरीक्षण झाले नव्हते. सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती ( RTI activist Dinesh Bhole ) मिळविली. त्यामधून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्याचा भाजपकडून दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येऊनही कुठेही कारवाई झालेली नाही.

जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे आमरण उपोषण

हेही वाचा-जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बोगस कोरोना रिपोर्ट प्रकरणात दोन जण दोषी

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी-

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी केला आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी केली आहे. पालकमंत्री असो की कुणी इतर जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या अत्तरदे त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे ( Chandrashekar Attarde hunger strike in Jalgaon ) यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा-Rupali Chakankar Slammed Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांना यांना महाराष्ट्रातील जनता आठवण करून देईल-रुपाली चाकणकर

Last Updated : Feb 9, 2022, 6:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details